पोस्ट्स

जुलै, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किसलय - रमेश वाबगावकर

रूजलो मी मातीमध्ये रक्ताचे शिंपण केले ह्रदयाला फुटले कोंभ कोंभाला लालस पाने पानांची ओली सळसळ उन्मेष गूढ भावांचे कोवळ्या किसलयासंगे अनुबंध तुझ्या प्रेमाचे स्व रमेश वाबगावकर यांच्या किसलय या नोव्हेंबर, १९९० ला पृथ्वी प्रकाशन वांद्रे मुंबई ने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहातील या ओळी. स्व रमेश वाबगावकर हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक या पदावर कार्यरत होते. कविमनाचा हा माणूस ५जुलै, २०१४ रोजी वयाच्या ८३व्या वर्षी अनंतात विलीन झाला. त्यांचा किसलय हा कवितासंग्रह अलिकडेच वाचनात आला. पुनर्जन्म, पणती, कातर, दवारलेल्या फिकट पहाटे, परी दूरचे क्षितिज, गावात राम उरला नाही, आकांत, कळू नये ते कळते, नाते, बेताचे, यासारख्या ७३ कवितांचा हा संग्रह खरोखर वाचनीय आहे. उंबरठा ओलांडून आली तांबुसगोरी तुझी पाऊले... तुझ्या निरामय सहवासाने पुनर्जन्म वास्तुस लाभला 'यासारखी भावना आपल्या सहचारिणीबद्दल व्यक्त होतांना दिसते. दवारलेल्या फिकट पहाटे गवतामधले नवथर पाते शाल पांघरुन तलम धुक्याची रम्य कोवळे हास्य फुलविते या सारख्याकवितेतून निसर्गाचे विलोभनीय दर्शन होते. नव्हते अपुले कसले नाते कधीच ...