पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कविता

 कोणत्या वळणावर  तू भेटलीस  बदलून गेले माझे दिवस  कोणत्या वळणावर  तू दिसलीस  पालटून गेलीस माझी नजर  कोणत्या वळणावर  तू झालीस माझी  हरवून बसलो मी मला तुझ्यावर  @#विलास कुडके #28/5/2017

गप्पागोष्टी

 #प्रसंगी अखंडित गप्पा मारित जावे    जहाज जोपर्यंत समुद्राचे पाणी आत घेत नाही तोपर्यंत ते बुडूच शकत नाही. इतका सुंदर विचार मी डोळे मिटून ऐकत असलेल्या गप्पांमधून ऐकला. एक मोटारमन आपल्या मित्राला सांगत होता. दुनिया मला चांगले म्हणाली तर मला आनंद होत नाही आणि वाईट म्हटली तर मी ते मनाला लावूनच घेत नाही. त्यापलिकडे मी गेलो आहे. ज्यांनी मला वाईट म्हटले शिव्या दिल्या तेच महिना दोन महिन्याने मला साॅरी म्हणत आले. ऐकतच रहावे असे त्याचे बोलणे होते         पश्चिम लाईनवर तो विरारवरुन लोकल चालवतो आणि सेंट्रल लाईनला राहतो अशी माहिती कळाली. ट्रेन लेट का चालतात. दोन्ही रुट्स कसे वेगळे आहेत. रेल्वे सर्व सुविधा द्यायला तयार आहेत पण लोक कसे सुविधांची नासधूस करतात. चोरी करतात. एकेक चाक 45 हजाराचे असते. पेंटाग्राफ लाखाचा असतो. जगात एवढा स्वस्त प्रवास फक्त भारतीय रेल्वेत कसा करता येतो. दिवसांतून किती वेळा चेन खेचली जाते कितीतरी विषय ज्यांना आपला स्पर्शही झालेला नसतो ते एकेक विषय त्या गप्पांमधून उलगडत गेले.          गप्पा ऐकणेही आनंददायी असू शकते. शेअर मार्केट राजकारण यावरील गप्पांमधून तर उलट सुलट इतक्या गप्प

क्षण चमकते

        लाॅकडाऊनमध्ये दुपारी सहज गॅलरीत आलो. रस्त्यावर एक दोन वाहने येत जात होती. निर्मनुष्य रस्त्यावर फक्त समोरच्या पिंपळाची सळसळ ऐकू येत होती. चिंचेला नवीन पालवी आलेली. आकाशाशी त्याही पानांचा काहीतरी संवाद सुरु होता.        अचानक माझे लक्ष गॅलरीतून वार्‍यावर हेलखावे खात लहणार्‍या तुळशीच्या नाजूक मंजिर्‍यांकडे गेले. इवली इवली जांभळी फुले मंजिर्‍यांवर आलेली असावी. कधी एवढे बारकाईने पाहिलेले नव्हते त्यामुळे नवल वाटले. आणखी नवल वाटले ते इवलाशी मधमाशी हवेतल्या हवेत पंखांची विद्युतगतीने वेगात हालचाल करत तेवढ्या उंचावर त्या हेलकावत्या मंजिर्‍यांवरील इवल्या जांभळ्या फुलांवर बसण्याचा प्रदीर्घ प्रयत्न करीत होती.         आश्चर्य वाटले. जीव तो केवढा. पंख इवले. पण एवढ्या विलक्षण लहरत्या प्रसंगात एकसारखा किती प्रयत्नशील आहे! एवढे प्रयत्न आपण करतो का. मला तर ती मधमाशी इवली जेम्स बाँड वाटली. तिच्या अथक प्रयत्नशीलतेकडे पाहिले तर भल्या भल्या आळशी माणसांचा आळस चुटकीसरशी कुठल्याकुठे पळून जाईल. पण आळशी माणूस डोळे उघडे ठेवून अशा प्रेरक क्षणांकडे पाहिल तर ना.             लाॅकडाऊनमध्ये आळसवलेल्या माझ्या सार