पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आठवणींची फुलपाखरे

 #आठवणींची फुलपाखरे मन निवांत होते. क्षणभरच. या निवांतपणाच्या क्षणांच्या फुलांवर अलगद आठवणीचे एकेक फुलपाखरु बसून जाते.. त्यांच्या रंगबिरंगी पंखांवर मन मागे मागे जात रहाते... आज मला अचानक मित्राच्या आईची आठवण आली. मला आठवते तेव्हा मी तीन वर्षांचा गॅप घेऊन रायते सरांनी पुन्हा शिकायची प्रेरणा दिल्यावर विज्ञानाची आवड बाजूला ठेवून वाणिज्य शाखेत अकरावीला के टी एच एम काॅलेजमध्ये १९८० मध्ये प्रवेश घेतला. तेव्हा मी नाशिकमध्ये मेनरोडला रेडिमेड कपड्याच्या दुकानात हेल्पर म्हणून कामाला होतो. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ अशी ड्युटी असायची. दुपारी दोन तास जेवणाची सुट्टी. काॅलेजला जायचे तर मी मालकाला म्हटले ही दोन तासांची सुट्टी मला सकाळी द्या. मालक तयार झाले. झाले. सकाळी दहापर्यंतचे पिरियड कसेबसे अटेंड करुन मी साडेदहाला दुकानात जाई. काॅलेजमध्ये खराडे आणि सातपुते हे दोन मित्र मिळाले. वर्गात हमीद इनामदार हा मित्र खूप छान गाणे म्हणायचा. त्याने एकदा माझे नाव उर्दूमध्ये कसे लिहितात ते वहीवर काढून दाखवले होते. मला उर्दू शिकव असेही मी त्याला म्हणायचो. गुलाम अली यांनी गायलेल्या कितीतरी गझला त्याला तोंडपाठ ह

आईच्या आठवणी4

 #आईच्या आठवणी           आई पहिली गुजरातमध्ये जंबुसरला विठ्ठलराव मलेटे यांना दिली होती. अगदी कमी वयात लग्न झालेले होते. श्रीमंत घराणे होते. झुमकावाले यांचे जंबुसरला मार्केटमध्ये खेळण्यांचे दुकान होते. मलेटेंच्या घरी कागदी खोक्यांचा उद्योग होता. विठ्ठलराव अचानक छातीत कळ येऊन रक्ताची वांती होऊन एकाएकी गेले. आणि आई विधवा झाली. पुन्हा नंदुरबारला आईकडे आली. आजीची एक बहिण पंचवटीत आबा भोईरांकडे दिलेली होती. एक बहिण नगरसूलला पुंजाबा सकडे यांना दिलेली होती. वडिल व्हर्नाक्युलर फायनल झाल्यावर नाशिक मध्ये शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. नगरसुलच्या आजीने पुढाकार घेऊन आई आणि वडीलांचे लग्न जुळवले. आईचे हे दुसरे लग्न. आधीचे घर अगदी श्रीमंत तर वडिलांची परिस्थिती अतिशय गरीबीची. तेव्हा खासगी संस्थेत शिक्षकांना अतिशय कमी पगार होता. दोघांच्या वयातही खूप अंतर होते. वडीलांची जन्मतारीख १५/४/१९१७ तर आईची २९/११/१९३३. आई अगदी मुलगीशी पण अंगाने दंडम होती.           अरुण नावाचा पहिल्या घरातील माझा मोठा भाऊ होता. मला आठवते डोक्यावर हॅट घालुन तो कधी कधी आईला भेटायला जंबुसरवरुन यायचा. त्याचे नंतर निधन झाले. जंबुसरला र

आईच्या आठवणी3

 #आईच्या आठवणी        काळाच्या ओघात आपण किती पुढे आलेलो असतो. एकेक गोष्ट जशी निसटत गेलेली आठवते. कोणी म्हणतं कशाला पाहिजे आता आठवणी. जे गेले ते काय परत येणार तर नाही. पण जेव्हा जिव्हाळाचा ओलावा कुठे दिसेनासा होतो. गरजेपुरती कोरडी नाती उरतात. प्रत्येक गोष्टीचा व्यवहार होऊन जातो. देणे घेणे मोजून मापून होते. मनाजोगते झाले नाही की सहज कुठलेही नाते संपून जाते. सगळे मिळूनही रसच मिळत नाही. सगळ्या गुंत्यात राहूनही एकटेपण शिल्लकच राहते. अशावेळी निसटलेल्या क्षणांच्या आठवणी मनावर शांत शिडकावा करतात            गाय दी मोपासा यांची नेकलेस कथा वाचता वाचता अचानक मला आईच्या नेकलेसची आठवण झाली. आईला त्या काळात एखादा नेकलेस असावा अशी फार मोठी मनीषा होती. तेव्हा सोनेही आजच्या इतके महाग नव्हते. सोन्याची हौस असलेली आई स्वयंपाक घरात पाण्याची भांडी ठेवायच्या ठिकाणी कोणाला दिसणार नाही अशा रीतीने ठेवलेल्या गाडग्यात घरखर्चासाठी मिळालेल्या तुटपुंज्या पैशातून बचत करुन पितळी पै एकेक करुन साठवायची. नागचौकात एक सोनाराचे दुकान होते. तिथे मैत्रिणीला घेऊन साठवलेल्या पितळी पयांतून तिने पाटल्या करुन घेतल्या होत्या. त्या ह

आईच्या आठवणी2

 #आईच्या आठवणी        आईबरोबर कुठे बाहेरगावी जायचं म्हणजे मोठी मौज असायची. आई कधी भागापूरला आजोळी तर कधी नंदूरबारला तिच्या आईकडे मला घेऊन जायची. कधी गुजरातमध्ये जंबूसरला तिच्या बहिणीकडेही घेऊन जायची. प्रवासाला निघायचे म्हणजे ती भरपूर गुळाच्या दशम्या करायची आणि वर शेंगदाण्याची चटणी. पाण्याचा पितळी फिरकीचा तांब्या असायचा. एसटीत मला मांडीवर घेऊन बसली की मी खिडकीतून बाहेर खाली पहायचो तर मला गाडी कशीकाय धावते याचा प्रश्न पडायचा कारण चाक कुठेच दिसायचे नाही. रेल्वेचे डबे तेव्हा गेरु रंगाचे असायचे आणि कोळशाचे शिट्ट्या मारणारे इंजिन असायचे. मी लहान असल्याने आई माझे तिकीट काढायची नाही तर मला बर्थवर घेऊन अशी झोपायची की येणाऱ्या जाणाऱ्याला मी अजिबात दिसायचो नाही. एकदा असेच नंदूरबारहून सुरतकडे रेल्वेने ती मला घेऊन निघाली. बरोबर मामा कंपनीही होती. आई मला नेहमीप्रमाणे घेऊन बर्थवर झोपली होती. गाडीत तिकीट चेकर आला त्याने सर्वांची तिकीटे चेक केले. बर्थवर झोपलेल्या आईचे तिकीट विचारले ते मामाने काढून दाखवले. तिकीट चेकर पुढे जाणार तोच मी कुतुहलाने उठून वाकून पाहायला लागलो 'काय ग पमा' म्हणालो. सारे

आईच्या आठवणी

 #आईच्या आठवणी        मला आठवते मी खूप लहान असेन. आईच्या सारखे मागे मागे असायचो. मला सोडून आईने काहीच करु नये असे वाटायचे. आईला कामही करता यायचे नाही. रडून रडून आईचा मी अगदी पिच्छा पुरवायचो मग ती वैतागून अस्सा काही रट्टा ठेवून द्यायची की मी मुसमुसत आईशी बोलायचेच नाही असे ठरवून खिडकीत जाऊन बसायचो. आई मग कामात लागे. कामाच्या नादात ती मला विसरुनही जायची. बरे कामेही खूप असायची. सकाळी खाली उतरुन सार्वजनिक नळावरुन हंडे कळशा भरुन आणायच्या असे. तांब्याचा बंब पेटवून पाणी गरम करायचे असे. दारावर आलेल्या मोळीवालीकडून लाकडाची मोळी घेणे. ती मधल्या अंधारया खोलीत बल्ब लावून रचून घेणे. सकाळची झाडझूड. दार लावून आंघोळ. नववारी नेसणे. घडीच्या आरसापेटीपुढे बसून केसांचा अंबाडा घालणे. कुंकू रेखणे. जर्मलच्या पातेल्यात धुणे आणि धोपाटणे घेऊन घरात मला ठेवून बाहेरुन कडी लावून 'आले बरका.. घरातच खेळ' सांगून गंगेवर (गोदाकाठी) धुणे धुवायला जाणे. बाजारातून पिशवीत गहू आणणे. निवडणे. कितीतरी कामे. एकदा मी असाच रुसून खिडकीत बसून राहिलो. बघत राहिलो. आई कधी कामातून माझ्याकडे बघते व समजूत काढते. पण कसचे काय. अगदी अंधा

माझ्या पुस्तकप्रेमाची गोष्ट

             'भेट म्हणून पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक द्या' असे आज म्हटले जाते. भिलार येथे पुस्तकांचे गाव उभे राहिले आहे. एका पाश्चात्य शौकिनाने पुस्तकांचेच घर बांधले आहे. म्हणजे भिंतींमध्ये पुस्तकेच पुस्तके. पावसाच्या पहिल्या थेंबाने मातीला गंध यावा तशा कोरया पुस्तकांचा मोहवून टाकणारा गंध आवडणार नाही असा माणूस विरळा आहे. पूर्वी न शिकलेली माणसंही 'किती बुकं शिकलास?' असे विचारुन विद्वत्ता पडताळायचे. पूर्वीच्या सिनेमांमध्ये नायक नायिका धक्का लागून खाली पडलेली पुस्तके उचलून देता देता आणि पुस्तकांची देवाणघेवाण करीत करीत एकमेकांच्या प्रेमात पडायची. पुस्तकात लपवलेला फोटो चोरुन काढून पहायचे. पुस्तकात मिळालेला गुलाब जपून ठेवायचे. शाळेतील पोरं पिंपळाची पाने पुस्तकात ठेवून ती जाळीदार करायचे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.       आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे आणि एकेक पान पलटत जायचे आहे असे कितीतरी जनांना वाटत असते. एका शायरने फार सुंदर म्हटले आहे'समय मिलनेपर मुझे पढना जरुर हकीकत ऐ जिंदगी की मुकम्मल किताब हूँ मै'. अलिकडे वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनासाठी स्टाॅलवर मोफत वाचनासाठी उपलब्ध

अँक्वेरियम

 अँक्वेरियम  समुद्र एक योगी.. अथांग.. समाधिस्थ मुद्रेचा शांत शांत.. तो बराचवेळ भारावल्यागत ती मुद्रा पाहण्यात मग्न असा खिडकीशी उभा.. एकटाच.. स्वत:चेच प्रतिबिंब पाहत असल्याप्रमाणे!  `काय पाहताय एवढे? ` पाठीमागून हळूवार आवाज आला तशी त्याची ती भावसमाधि भंग पावली, तिने हळूच पाठीमागून त्याच्या खांद्याशी कपाळ टेकवले. ती लाडिकपणें पुटपुटली - `मी इथे असतांना, एवढं काय आहे त्या समुद्रात पाहण्यासारखे - ` `अं? कुठे काय? `हळूच तो तिला आपल्या बाहुत घेतो - `लाडके, या समुद्राची मुद्रा किती आल्हाददायक आहे नाही? ` `आणि माझी मुद्रा काही नाही वाटतं `तिचा त्रासिक स्वर.`तसं नाही गं - `त्याचे कसेबसे शब्द.  तो पूर्ण भानावर येतो. अजूनही समुद्राची झिंग त्याची डोक्यातून उतरलेली नसते. त्याची नजर खोलीत भिरभिरते. एकूणएक सुखाच्या प्रतिकृतीवरुन फिरत राहते. टेलिव्हिजन, फर्निचर, सिलिंग फँन, एसी, संगमरवरी पुतळे, भिंती, अँक्वेरियम,  हिरवे पडदे आणि बाहुत विसावलेली ती..पावलांना सुखावणारे गालिचे. अभावितपणे तो उद्गारतो, `डार्लिंग - ` `हूं `ती अजूनही तशीच त्याच्या कुशीतील ऊबेनें स्थिरावलेली. खिडकीतून हळूवार झुळूका. हलणारे पड

शुभेच्छा

 #शुभेच्छा       दाहीदिशांनी जेव्हा शुभेच्छा येऊ लागतात तेव्हा सारा आसमंत कसा सकारात्मक ऊर्जेने भरुन वाहू लागल्यासारखा वाटू लागतो. मला आठवते माझ्या लहानपणी पोस्टमन दिवाळीच्या आसपास १५ पैशांच्या कार्डावर लक्ष्मी गणपती सरस्वती यांची चित्रे असलेली शुभेच्छापत्रे देऊन जायचा तेव्हा काय आनंद व्हायचा. कितीतरी वेळ कितीतरी दिवस ते कार्ड न्याहाळण्यात जायचा. या दिवसात पोस्टमनवर अशी पोस्टकार्ड घरोघरी वाटण्याचे किती काम येऊन पडायचे पण ते आवर्जून सगळे कार्ड ज्याला त्याला पोहोचवायचे. त्यांना मग घरोघर फराळाचा आग्रह व्हायचा. प्रेमाने पोस्त दिली जायची.  दूरवर कोठेतरी रहात असलेली मामा मावशी काका यांची ती शुभेच्छापत्रे असायची. ती नात्याची माणसे या कार्डातून अगदी जवळ आल्यासारखी वाटायची.           आता ती पोस्टकार्डावरील शुभेच्छा दुर्मीळ झाली आहेत. ती आतुरता ती हुरहुर ते खंतावणे आता राहिलेले नाही. समाजमाध्यमांनी हे काम अगदी सोपे आणि आकर्षक करुन टाकले आहे. वाॅटसअॅप फेसबुकवर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत राहतो.            सुंदर शब्दांच्या पखरणी करुन, सुंदर सुंदर ओळींतून शुभेच्छा नखशिखांत नटून येत आहेत. काही पदरच

दोन प्रेमाचे शब्द

                   जगात सर्वात महाग असतील तर ते फक्त दोन प्रेमाचे शब्द. सर्व मिळेल पण दोन प्रेमाचे शब्द मिळणार नाही. हे शब्द असतात तरी कोठे. प्रत्येकाच्याच अंत:करणात पण ते ओठांवर कधी येत नाहीत. कदाचित ओठांवर येण्यासाठी महत्प्रयास पडत असावे. शक्यतो प्रेमाचे दोन शब्द जो तो ओठांवर येऊच देत नाही. कुठेतरी खोल काटेरी कुंपणात कैद करुन ठेवतो असले भावूक हळवे शब्द. असे असले तरी प्रत्येकाला या शब्दांची अपेक्षा असते मात्र दुसऱ्याकडून. पण ही अपेक्षा सहसा पूर्ण होत नाही. जोपर्यंत अंत:करण हिशेबी स्वार्थी व्यावहारिकतेने भरलेले असते. प्रेमाच्या शब्दांची अपेक्षाच करायला नको.           प्रत्येकाच्या वाट्याला कटू अनुभव येत जातात आणि ओठांवर कडवटपणा येत राहतो. अशामध्ये अंत:करणातील शब्द येतील कोठून. असे शब्द खर्चावे असेही आयुष्यात कोणी भेटत नाही. खूप आठवून पाहिले तर आयुष्यात आई वडील बहिण यांच्याव्यतिरिक्त कोणाहीकडून आपण प्रेमाचे शब्द ऐकलेले नाहीत असे लक्षात येईल. मला माझी आत्या ज्या कळवळ्याने ईलास म्हणायची तशी हाक नंतरच्या आयुष्यात कोणीही मारली नाही.           उंबरयाबाहेर पाऊल टाकले तर समंजस व्यवहारिक शब्दां

अण्णा

 वर्ष झाले. अण्णा गेले असे वाटतच नाही. आजही त्यांनी उभारलेल्या घराच्या अंगणात गोकुळ नांदतय. त्यांनी अंगणात लावलेल्या आंब्याला मोहर आला आहे. पेरुच्या झाडावर पाहुणे पक्षी हजेरी लावून जात आहेत. उगवत्या सूर्याचे ग्रिल असलेले गेट. नक्षीदार भिंतीतील कोनशिलेवर नाव नजरेत भरतात 'श्री पुंडलिकराव भिमसिंगजी धुमाळ आणि त्याखाली सौ. सुलभा पुंडलिकराव धुमाळ' त्याखाली योगेश्वर बंगला क्रमांक 23 गोदावरी हाऊसिंग सोसायटी नं1. पांढर्‍या शुभ्र गोकर्णीची वेल डोकवती. जवळच पांढरया चांदणीचे फुलझाड. मध्ये फरशीचा रस्ता. दोन्ही बाजूला अबोली, गुलाब, तुळशी.