#प्रसंगी अखंडित गप्पा मारित जावे जहाज जोपर्यंत समुद्राचे पाणी आत घेत नाही तोपर्यंत ते बुडूच शकत नाही. इतका सुंदर विचार मी डोळे मिटून ऐकत असलेल्या गप्पांमधून ऐकला. एक मोटारमन आपल्या मित्राला सांगत होता. दुनिया मला चांगले म्हणाली तर मला आनंद होत नाही आणि वाईट म्हटली तर मी ते मनाला लावूनच घेत नाही. त्यापलिकडे मी गेलो आहे. ज्यांनी मला वाईट म्हटले शिव्या दिल्या तेच महिना दोन महिन्याने मला साॅरी म्हणत आले. ऐकतच रहावे असे त्याचे बोलणे होते पश्चिम लाईनवर तो विरारवरुन लोकल चालवतो आणि सेंट्रल लाईनला राहतो अशी माहिती कळाली. ट्रेन लेट का चालतात. दोन्ही रुट्स कसे वेगळे आहेत. रेल्वे सर्व सुविधा द्यायला तयार आहेत पण लोक कसे सुविधांची नासधूस करतात. चोरी करतात. एकेक चाक 45 हजाराचे असते. पेंटाग्राफ लाखाचा असतो. जगात एवढा स्वस्त प्रवास फक्त भारतीय रेल्वेत कसा करता येतो. दिवसांतून किती वेळा चेन खेचली जाते कितीतरी विषय ज्यांना आपला स्पर्शही झालेला नसतो ते एकेक विषय त्या गप्पांमधून उलगडत गेले. गप्पा ऐकणेही आनंददायी असू शकते. शेअ...
#शुभेच्छा दाहीदिशांनी जेव्हा शुभेच्छा येऊ लागतात तेव्हा सारा आसमंत कसा सकारात्मक ऊर्जेने भरुन वाहू लागल्यासारखा वाटू लागतो. मला आठवते माझ्या लहानपणी पोस्टमन दिवाळीच्या आसपास १५ पैशांच्या कार्डावर लक्ष्मी गणपती सरस्वती यांची चित्रे असलेली शुभेच्छापत्रे देऊन जायचा तेव्हा काय आनंद व्हायचा. कितीतरी वेळ कितीतरी दिवस ते कार्ड न्याहाळण्यात जायचा. या दिवसात पोस्टमनवर अशी पोस्टकार्ड घरोघरी वाटण्याचे किती काम येऊन पडायचे पण ते आवर्जून सगळे कार्ड ज्याला त्याला पोहोचवायचे. त्यांना मग घरोघर फराळाचा आग्रह व्हायचा. प्रेमाने पोस्त दिली जायची. दूरवर कोठेतरी रहात असलेली मामा मावशी काका यांची ती शुभेच्छापत्रे असायची. ती नात्याची माणसे या कार्डातून अगदी जवळ आल्यासारखी वाटायची. आता ती पोस्टकार्डावरील शुभेच्छा दुर्मीळ झाली आहेत. ती आतुरता ती हुरहुर ते खंतावणे आता राहिलेले नाही. समाजमाध्यमांनी हे काम अगदी सोपे आणि आकर्षक करुन टाकले आहे. वाॅटसअॅप फेसबुकवर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत राहतो. सुंदर शब्दां...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा