पोस्ट्स

कविता

 कोणत्या वळणावर  तू भेटलीस  बदलून गेले माझे दिवस  कोणत्या वळणावर  तू दिसलीस  पालटून गेलीस माझी नजर  कोणत्या वळणावर  तू झालीस माझी  हरवून बसलो मी मला तुझ्यावर  @#विलास कुडके #28/5/2017

गप्पागोष्टी

 #प्रसंगी अखंडित गप्पा मारित जावे    जहाज जोपर्यंत समुद्राचे पाणी आत घेत नाही तोपर्यंत ते बुडूच शकत नाही. इतका सुंदर विचार मी डोळे मिटून ऐकत असलेल्या गप्पांमधून ऐकला. एक मोटारमन आपल्या मित्राला सांगत होता. दुनिया मला चांगले म्हणाली तर मला आनंद होत नाही आणि वाईट म्हटली तर मी ते मनाला लावूनच घेत नाही. त्यापलिकडे मी गेलो आहे. ज्यांनी मला वाईट म्हटले शिव्या दिल्या तेच महिना दोन महिन्याने मला साॅरी म्हणत आले. ऐकतच रहावे असे त्याचे बोलणे होते         पश्चिम लाईनवर तो विरारवरुन लोकल चालवतो आणि सेंट्रल लाईनला राहतो अशी माहिती कळाली. ट्रेन लेट का चालतात. दोन्ही रुट्स कसे वेगळे आहेत. रेल्वे सर्व सुविधा द्यायला तयार आहेत पण लोक कसे सुविधांची नासधूस करतात. चोरी करतात. एकेक चाक 45 हजाराचे असते. पेंटाग्राफ लाखाचा असतो. जगात एवढा स्वस्त प्रवास फक्त भारतीय रेल्वेत कसा करता येतो. दिवसांतून किती वेळा चेन खेचली जाते कितीतरी विषय ज्यांना आपला स्पर्शही झालेला नसतो ते एकेक विषय त्या गप्पांमधून उलगडत गेले.          गप्पा ऐकणेही आनंददायी असू शकते. शेअ...

क्षण चमकते

        लाॅकडाऊनमध्ये दुपारी सहज गॅलरीत आलो. रस्त्यावर एक दोन वाहने येत जात होती. निर्मनुष्य रस्त्यावर फक्त समोरच्या पिंपळाची सळसळ ऐकू येत होती. चिंचेला नवीन पालवी आलेली. आकाशाशी त्याही पानांचा काहीतरी संवाद सुरु होता.        अचानक माझे लक्ष गॅलरीतून वार्‍यावर हेलखावे खात लहणार्‍या तुळशीच्या नाजूक मंजिर्‍यांकडे गेले. इवली इवली जांभळी फुले मंजिर्‍यांवर आलेली असावी. कधी एवढे बारकाईने पाहिलेले नव्हते त्यामुळे नवल वाटले. आणखी नवल वाटले ते इवलाशी मधमाशी हवेतल्या हवेत पंखांची विद्युतगतीने वेगात हालचाल करत तेवढ्या उंचावर त्या हेलकावत्या मंजिर्‍यांवरील इवल्या जांभळ्या फुलांवर बसण्याचा प्रदीर्घ प्रयत्न करीत होती.         आश्चर्य वाटले. जीव तो केवढा. पंख इवले. पण एवढ्या विलक्षण लहरत्या प्रसंगात एकसारखा किती प्रयत्नशील आहे! एवढे प्रयत्न आपण करतो का. मला तर ती मधमाशी इवली जेम्स बाँड वाटली. तिच्या अथक प्रयत्नशीलतेकडे पाहिले तर भल्या भल्या आळशी माणसांचा आळस चुटकीसरशी कुठल्याकुठे पळून जाईल. पण आळशी माणूस डोळे उघडे ठेवून अशा प्रेरक क्षणांकडे प...

आठवणींची फुलपाखरे

 #आठवणींची फुलपाखरे मन निवांत होते. क्षणभरच. या निवांतपणाच्या क्षणांच्या फुलांवर अलगद आठवणीचे एकेक फुलपाखरु बसून जाते.. त्यांच्या रंगबिरंगी पंखांवर मन मागे मागे जात रहाते... आज मला अचानक मित्राच्या आईची आठवण आली. मला आठवते तेव्हा मी तीन वर्षांचा गॅप घेऊन रायते सरांनी पुन्हा शिकायची प्रेरणा दिल्यावर विज्ञानाची आवड बाजूला ठेवून वाणिज्य शाखेत अकरावीला के टी एच एम काॅलेजमध्ये १९८० मध्ये प्रवेश घेतला. तेव्हा मी नाशिकमध्ये मेनरोडला रेडिमेड कपड्याच्या दुकानात हेल्पर म्हणून कामाला होतो. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ अशी ड्युटी असायची. दुपारी दोन तास जेवणाची सुट्टी. काॅलेजला जायचे तर मी मालकाला म्हटले ही दोन तासांची सुट्टी मला सकाळी द्या. मालक तयार झाले. झाले. सकाळी दहापर्यंतचे पिरियड कसेबसे अटेंड करुन मी साडेदहाला दुकानात जाई. काॅलेजमध्ये खराडे आणि सातपुते हे दोन मित्र मिळाले. वर्गात हमीद इनामदार हा मित्र खूप छान गाणे म्हणायचा. त्याने एकदा माझे नाव उर्दूमध्ये कसे लिहितात ते वहीवर काढून दाखवले होते. मला उर्दू शिकव असेही मी त्याला म्हणायचो. गुलाम अली यांनी गायलेल्या कितीतरी गझला त्याला तोंडप...

आईच्या आठवणी4

 #आईच्या आठवणी           आई पहिली गुजरातमध्ये जंबुसरला विठ्ठलराव मलेटे यांना दिली होती. अगदी कमी वयात लग्न झालेले होते. श्रीमंत घराणे होते. झुमकावाले यांचे जंबुसरला मार्केटमध्ये खेळण्यांचे दुकान होते. मलेटेंच्या घरी कागदी खोक्यांचा उद्योग होता. विठ्ठलराव अचानक छातीत कळ येऊन रक्ताची वांती होऊन एकाएकी गेले. आणि आई विधवा झाली. पुन्हा नंदुरबारला आईकडे आली. आजीची एक बहिण पंचवटीत आबा भोईरांकडे दिलेली होती. एक बहिण नगरसूलला पुंजाबा सकडे यांना दिलेली होती. वडिल व्हर्नाक्युलर फायनल झाल्यावर नाशिक मध्ये शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. नगरसुलच्या आजीने पुढाकार घेऊन आई आणि वडीलांचे लग्न जुळवले. आईचे हे दुसरे लग्न. आधीचे घर अगदी श्रीमंत तर वडिलांची परिस्थिती अतिशय गरीबीची. तेव्हा खासगी संस्थेत शिक्षकांना अतिशय कमी पगार होता. दोघांच्या वयातही खूप अंतर होते. वडीलांची जन्मतारीख १५/४/१९१७ तर आईची २९/११/१९३३. आई अगदी मुलगीशी पण अंगाने दंडम होती.           अरुण नावाचा पहिल्या घरातील माझा मोठा भाऊ होता. मला आठवते डोक्यावर हॅट घालुन तो कधी कधी आईला भेटाय...

आईच्या आठवणी3

 #आईच्या आठवणी        काळाच्या ओघात आपण किती पुढे आलेलो असतो. एकेक गोष्ट जशी निसटत गेलेली आठवते. कोणी म्हणतं कशाला पाहिजे आता आठवणी. जे गेले ते काय परत येणार तर नाही. पण जेव्हा जिव्हाळाचा ओलावा कुठे दिसेनासा होतो. गरजेपुरती कोरडी नाती उरतात. प्रत्येक गोष्टीचा व्यवहार होऊन जातो. देणे घेणे मोजून मापून होते. मनाजोगते झाले नाही की सहज कुठलेही नाते संपून जाते. सगळे मिळूनही रसच मिळत नाही. सगळ्या गुंत्यात राहूनही एकटेपण शिल्लकच राहते. अशावेळी निसटलेल्या क्षणांच्या आठवणी मनावर शांत शिडकावा करतात            गाय दी मोपासा यांची नेकलेस कथा वाचता वाचता अचानक मला आईच्या नेकलेसची आठवण झाली. आईला त्या काळात एखादा नेकलेस असावा अशी फार मोठी मनीषा होती. तेव्हा सोनेही आजच्या इतके महाग नव्हते. सोन्याची हौस असलेली आई स्वयंपाक घरात पाण्याची भांडी ठेवायच्या ठिकाणी कोणाला दिसणार नाही अशा रीतीने ठेवलेल्या गाडग्यात घरखर्चासाठी मिळालेल्या तुटपुंज्या पैशातून बचत करुन पितळी पै एकेक करुन साठवायची. नागचौकात एक सोनाराचे दुकान होते. तिथे मैत्रिणीला घेऊन साठवलेल्या ...

आईच्या आठवणी2

 #आईच्या आठवणी        आईबरोबर कुठे बाहेरगावी जायचं म्हणजे मोठी मौज असायची. आई कधी भागापूरला आजोळी तर कधी नंदूरबारला तिच्या आईकडे मला घेऊन जायची. कधी गुजरातमध्ये जंबूसरला तिच्या बहिणीकडेही घेऊन जायची. प्रवासाला निघायचे म्हणजे ती भरपूर गुळाच्या दशम्या करायची आणि वर शेंगदाण्याची चटणी. पाण्याचा पितळी फिरकीचा तांब्या असायचा. एसटीत मला मांडीवर घेऊन बसली की मी खिडकीतून बाहेर खाली पहायचो तर मला गाडी कशीकाय धावते याचा प्रश्न पडायचा कारण चाक कुठेच दिसायचे नाही. रेल्वेचे डबे तेव्हा गेरु रंगाचे असायचे आणि कोळशाचे शिट्ट्या मारणारे इंजिन असायचे. मी लहान असल्याने आई माझे तिकीट काढायची नाही तर मला बर्थवर घेऊन अशी झोपायची की येणाऱ्या जाणाऱ्याला मी अजिबात दिसायचो नाही. एकदा असेच नंदूरबारहून सुरतकडे रेल्वेने ती मला घेऊन निघाली. बरोबर मामा कंपनीही होती. आई मला नेहमीप्रमाणे घेऊन बर्थवर झोपली होती. गाडीत तिकीट चेकर आला त्याने सर्वांची तिकीटे चेक केले. बर्थवर झोपलेल्या आईचे तिकीट विचारले ते मामाने काढून दाखवले. तिकीट चेकर पुढे जाणार तोच मी कुतुहलाने उठून वाकून पाहायला लागलो 'काय ग पमा...