पोस्ट्स

ऑगस्ट, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिच्या हदयाची हाक - एच. ई. बेटस

तिच्या हदयाची हाक - एच. ई. बेटस                                     घरांत जाण्याऐवजी लिलियन म्हातारीला म्हणाली,' फुलं विकण्यात मी मदत करते तुम्हाला. मी बसते तुमच्याजवळ. 'हॅरी घरात गेला, आणि ती त्याच्या आईजवळ बसून राहिली. दुरुन एखादी गाडी येतांना दिसली की म्हातारी आणि ती' डॅफोडिल 'च्या कुंड्या उचलून दाखवीत. परंतु गाडी थांबत नसे. एखादी गाडी वेग कमी करुन सावकाश जाऊ लागे ;परंतु तिच्यातली माणसं क्षणभर' डॅफोडिल 'च्या फुलांकडे, त्या दोघीजणींकडे, आणि वाडीवरच्या पिवळ्या घराकडे बघितल्यासारखं करीत, आणि मग गाडी पुढे जाई. सारं वातावरण इतकं विलक्षण शांत होतं की शहरात राहाणाऱ्या लिलियनला ते मनाची चलबिचल करणारं वाटलं. जिकडून तिकडून फुलांचे आणि सूर्यकिरणांनी गुळचट झालेल्या गवतांचे गंध येत होते. वाडीमागच्याविस्तीर्ण शेतवाडी सूर्यतापानं झोपी गेल्यासारखी वाटत होती.                                म्हातारी लिलिअनशी मधून मधून बोलत होती. या ब...
तिच्या हदयाची हांक - एच. ई. बेटस (4) शिस्तीनं प्रत्येक गोष्ट करावयाचा त्याचा स्वभाव होता म्हणून नव्हे, तर मंगळवार आणि शुक्रवार हे शहरांतल्या बाजाराचे दिवस होते म्हणून तो मोटारीत माल भरुन शहराकडे येई. वाडीवर कुठे कुठे कोणकोणती पिकं लावली होती, कोंबड्या, ससे, 'गीज' इत्यादींचे खुराडे कोठे होते, नांगरणीसाठी घेतलेले घोडं कुठे होतं, खतांचा सांठा कुठे केला होता, ते सारे ट्रॅव्हर्सनं तिला दाखवलं. तिनं पाहिलं तो ट्रव्हर्स झपाझप इकडे तिकडे करीत होता. आपल्या थोट्या पायामुळे आपल्या गतीत बिलकुल वैगुण्य येता कामा नये अशी जबरदस्त इच्छाशक्ती त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. अशाप्रकारे विलक्षण चपळाईनं तो लंगडत असतांना त्याच्याकडे पहाणं नको असं तिला वाटलं. त्याच्या सहवासांत असण्याची तिची इच्छा आश्चर्याच्या धक्क्यानं फुटून तुटून तिचे बारीक बारीक तुकडे झाले. परंतु त्याच्या चर्येवर आणि आवाजात जो गोड स्नेहभाव होता त्याचीही जाणीव तिला सारखी होती. वाडीवरच्या शेती बागायतीतून खूप पैसा काढावा, स्नेहीसोबती करावेत, एखाद्या स्त्रीवर प्रेम करावं यासाठी त्याच्या जीवाची धडपड चालली होती ती त्याच्या बोलण्यांतल्या ...
तिच्या हदयाची हांक - एच. ई. बेटस (3)   सुमारे पाच मैल गेल्यावर ट्रॅव्हर्सनं गाडी थांबविली. त्यानं तिच्या बाजूची खिडकी बंद होती ती उघडली. परंतु बसल्या बसल्याच त्यानं तसं केलं. वसंत ऋतूंतल्या वाऱ्याची नाजुक सुगंधित झुळूक तिच्या अंगावर आली. तिनं समोर पाहिलं तो थोड्याच अंतरावर वाडीचंरुंद पांढऱ्या रंगानं रंगविलेलं फाटक तिला दिसलं.यापलिकडे 'विलो' झाडांच्या रांगांतून गेलेली वाट होती. आणितिच्या पलीकडे फिकट पिवळा रंगदिलेलं एक घर होतं.   'एक मिनिटभर ऐक हं.' ट्रॅव्हर्स तिला म्हणाला, 'ऐकलंस?' त्याचं म्हणणं लक्षात न आल्याप्रमाणे तिनं त्याच्याकडे पाहिलं.   'ऐकू येत नाही तुला?'  असं विचारुन तिच्या गोंधळलेल्या चर्येकडे पाहून तो हसला. मग तो म्हणत होता तो आवाज तिला ऐकू आला. तो ऐकू येताच तिनं मान पुरती वर केली आणि पाहिलं तो फाटकापुढच्या एका 'विलो' वृक्षाच्या सोनेरी फुलांभोवती हजारो मधमाशा घोंघावत असलेल्या तिला दिसल्या. विस्मयानं ती अगदी निश्चल होऊन पहात व ऐकत राहिली. ते पाहून ट्रॅव्हर्सला आनंद झाला. तो तिला म्हणाला, 'या माझ्या मधमाशा.' त्यानं गाडी पुन...
तिच्या हदयाची हांक २. एका शुक्रवारी तिच्या लक्षात आलं की तो आपल्या ठरीव जागी नव्हता. खिडकीबाहेर पाहिल्यावर झाडांच्या फांद्या एकदम वठलेल्या तिला दिसल्या असत्या तर तिला जसं वाटलं असतं तसंच तो आपल्या जागी नसल्यामुळे तिला वाटलं. ती हाॅटेलच्या बाहेर पडली तेव्हा जिकडे पहावं तिकडे उदासपणा भरलेला आहे असं तिला वाटलं, आणि शून्यपणाचीही जाणीव तिला असह्य झाली.     पण ती रस्त्यावरच्या प्रकाशात आली तेव्हा एकदम ती जाणीव नाहीशी झाली. कारण ट्रॅव्हर्स तिच्याद्दृष्टीस पडला. एका जुन्या निळ्या रंगाच्या मोटारमध्ये तो बसलेला होता. का कुणास ठाऊक पण तिला एकदम वाटलं की तो आपलीच वाट पाहात आहे. तिचे पाय फरसबंद पायवाटेवर आपोआप थांबले, आणि ती थांबल्यावर तो तिच्याशी बोलला,   'आपण नेहमी एकमेकांकडे पहातो तेव्हा मी विचार केला, की थोडा बदल म्हणून एकमेकांशी बोलावं तरी' त्यानं अगदी साधेपणानं म्हटलं.   'हं' एवढंच ती म्हणाली. पण तिचं अंत:करण मित्रभावानं आणि आनंदानं भरलेलं होतं, आणि हदयात कोंडलेली कोणतीतरी भावना एकदाची मोकळी झाली असं तिला वाटलं.   मग थोडा वेळ ती तशीच सूर्यप्रकाशात फरसबंद वाटेवर ...
तिच्या हदयाची हांक - एच. ई. बेटस                                   वसंत ऋतू सुरु झाला होता. अशावेळी लिलिअन जाॅर्डनच्या लक्षांत आले की आपण प्रेमात सापडलो आहोत. असं काहीसं व्हावं अशी तिची इच्छा नव्हती, परंतु हॅरी ट्रॅव्हस नावाच्या एका पुरुषावर ती प्रेम करु लागली होती खरी. त्याच्यावर आपलं प्रेम जडलं याचं कारण काय असावं म्हणून ती कधी कधी स्वत:शी विचार करीत बसे. पण तिला काही आपल्या प्रेमाचं कारण निश्चित करता येत नसे. मग तिला वाटू लागे हॅरी ट्रॅव्हर्सचा एक पाय खोटा-लाकडाचा आहे म्हणूनच आपलं प्रेम त्याच्यावर बसलं की काय कुणास ठाऊक?                                   या सुमारास ती एका फॅक्टरीतल्या नोकरीवर होती. जराशा उभट चेहर्‍याची, पिंगट तकतकीत वर्णाची, स्वभावानं फार धीट आणि फार मायाळू. आपल्या मनातल्या गोष्टी सहसा तोंडावाटे न काढणारी अशी लिलिअन ही एक तरुण मुलगी होती. तिच्या पिंगट डोळ्यांच्या नजरेत प्रेमळपण ओतप्रोत भरलेला होता, ...