तिच्या हदयाची हांक - एच. ई. बेटस
(3)
सुमारे पाच मैल गेल्यावर ट्रॅव्हर्सनं गाडी थांबविली. त्यानं तिच्या बाजूची खिडकी बंद होती ती उघडली. परंतु बसल्या बसल्याच त्यानं तसं केलं. वसंत ऋतूंतल्या वाऱ्याची नाजुक सुगंधित झुळूक तिच्या अंगावर आली. तिनं समोर पाहिलं तो थोड्याच अंतरावर वाडीचंरुंद पांढऱ्या रंगानं रंगविलेलं फाटक तिला दिसलं.यापलिकडे 'विलो' झाडांच्या रांगांतून गेलेली वाट होती. आणितिच्या पलीकडे फिकट पिवळा रंगदिलेलं एक घर होतं.
'एक मिनिटभर ऐक हं.' ट्रॅव्हर्स तिला म्हणाला, 'ऐकलंस?'
त्याचं म्हणणं लक्षात न आल्याप्रमाणे तिनं त्याच्याकडे पाहिलं.
'ऐकू येत नाही तुला?' असं विचारुन तिच्या गोंधळलेल्या चर्येकडे पाहून तो हसला. मग तो म्हणत होता तो आवाज तिला ऐकू आला. तो ऐकू येताच तिनं मान पुरती वर केली आणि पाहिलं तो फाटकापुढच्या एका 'विलो' वृक्षाच्या सोनेरी फुलांभोवती हजारो मधमाशा घोंघावत असलेल्या तिला दिसल्या. विस्मयानं ती अगदी निश्चल होऊन पहात व ऐकत राहिली. ते पाहून ट्रॅव्हर्सला आनंद झाला. तो तिला म्हणाला, 'या माझ्या मधमाशा.' त्यानं गाडी पुन्हा सुरु केली आणि फाटकांतून आंत नेली तेव्हा त्याच्या तोंडावरचं हास्य लिलियनला स्पष्ट दिसलं. फाटकापासून घरापर्यंत गेलेल्या वाटेच्या दुतर्फा जे 'विलो' वृक्ष होते त्या प्रत्येकावर मधमाशांचे मोठेमोठे झुपके तिला दिसले, व त्या माशांचं संगीत चालू होतं ते तिला ऐकू आलं. एका बाजूच्या 'विलो' वृक्षांच्या रांगेपलीकडे 'चेरी' आणि 'प्लम' झाडांचा एक मोठा मांडव होता. त्याखाली कांही मेंढ्या आणि पांढरी शुभ्र कोकरं चरत होती. मेंढ्या चरल्यामुळे गवत कापल्यासारखं दिसत होतं. आणि त्या गवतावर जिथे जिथे प्लमचं झाड होतं तिथे त्याच्या बुंध्याशीं चकाकणारया पांढऱ्या पाकळ्यांचा सडा पडला होता.
गाडी घरापुढे थांबली. तेव्हा ट्रॅव्हर्स खाली उतरला, त्याच वेळी लिलिअन आपल्या बाजूचं दार उघडून खाली उतरली. 'विलो' वृक्षांच्या फुलांभोवती चाललेला मधमाशांचा आवाज या ठिकाणीहि ऐकू येत होता. तो ऐकत, मान वर उचलल्यासारखी करुन, ती क्षणभर जागच्या जागी उभी राहिली. ट्रॅव्हर्सही तसाच स्तब्ध उभा राहिला. मग त्यानं तिला विचारलं, 'तूं आलीस याबद्दल तुला आनंद होतो ना?'
तिनं उत्तर दिलं, ' होय. फार फार आनंद होतोय. '
' आता घरात जाऊ, चल. माझ्या आईची आणि तुझी ओळख करुन देतो. 'असं म्हणून पलीकडच्या बाजूनं तो तिच्याकडे येऊ लागला.
तो लंगडत आहे असं तिच्या लक्षांत आलं, आणि मग लगेच त्याच्या लंगडण्याचं कारणहि तिला प्रथमच समजलं. तिनं चटकन त्याच्या पायाकडे पाहिलं, आणि मग जणूं आपली नजर तिकडे गेली नाही असं दाखविण्यासाठी तिनं दुसरीकडे पाहिले.
ती ट्रॅव्हर्सच्या मागोमाग घरांत गेली खरी, परंतु स्वत:च्या गतीची तिला जाणीवच उरली नव्हती. तिला फक्त जमिनीवर त्याच्या लाकडी पायाचा होणारा आवाज ऐकू येत होता, आणि तो ऐकल्यामुळे तिच्या मनाची उलट कांही प्रतिक्रिया व्हावी ती मुळीच होत नव्हती. तिला जो आश्चर्याचा धक्का बसला होता त्यामुळे तिची सारी संवेदनाच नष्ट झाली होती, आणि तिनं जे एकदम तोंड फिरवलं होतं ते तसंच ठेवलं होतं. जणू मनावर एकदम झालेला असंतोषाचा आघात तिला अजूनही आठवत होता.
या सुंद मनस्थितीतून ती भानावर आली तेव्हा ट्रॅव्हर्सची आई तिच्यापुढे उभी होती, आणि ती तिच्याशी हस्तांदोलन करीत होती. ट्रॅव्हर्सची आई फार ठेंगणी होती. ठेंगणेपणामुळे तिला आपली नजर सारखीच उचलून वर ठेवावी लागत होती, व स्वत:विषयी वाटणारी अनुकंपा हदयांत कोंडून धरावी लागली की जी विषण्णतेची जडता माणसाच्या डोळ्यांत दिसते ती तिच्या त्या नजरेत आढळत होती. आपले हाडकुळे हात कंबरेभोवतालच्या फडक्यावर झटकन पुसून हस्तांदोलनासाठी तिनं पुढे केले होते. तिच्या चर्येवर चिंतातुरता अस्पष्टपणें दिसत होती. परंतु ती बोलताना अर्धवट हंसत होती, आणि कोणतंही वाक्य दोनदा उच्चारण्याची तिला खोड होती असं दिसलं. ती लिलिअनला म्हणाली,
'तू आलीस मला फार आनंद झाला. तू आलीस फार मला आनंद झाला. हॅरीची मैत्रिण आहेस तू. हे घर तुझंच आहे. हे घर तुझंच आहे '
म्हातारीच्या या उदगारावरुन आणि नंतरच्या संभाषणावरुन लिलिअनला कळून आलं की या मंडळींचा मित्रपरिवार अगदीच थोडा होता. तिला असंही समजलं की या वाडीवर ही मंडळी राहायला आली त्याला तीन वर्षे झाली होती. परोपरीचे कष्ट करुन वाडीवर ज्या ज्या गोष्टींची पैदास करता येईल तिची करुन व त्या गोष्टी शहरात विकून ट्रॅव्हर्स आणि त्याची आई चांगले दिवस यावेत यासाठी धडपडत होती. ट्रॅव्हर्स तिला हॉटेलात मंगळवारी आणि शुक्रवारींच नियमानं दिसला होता याचं खरं कारण आता तिला कळलं. (क्रमश:)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा