तिच्या हदयाची हांक - एच. ई. बेटस (4)
शिस्तीनं प्रत्येक गोष्ट करावयाचा त्याचा स्वभाव होता म्हणून नव्हे, तर मंगळवार आणि शुक्रवार हे शहरांतल्या बाजाराचे दिवस होते म्हणून तो मोटारीत माल भरुन शहराकडे येई. वाडीवर कुठे कुठे कोणकोणती पिकं लावली होती, कोंबड्या, ससे, 'गीज' इत्यादींचे खुराडे कोठे होते, नांगरणीसाठी घेतलेले घोडं कुठे होतं, खतांचा सांठा कुठे केला होता, ते सारे ट्रॅव्हर्सनं तिला दाखवलं. तिनं पाहिलं तो ट्रव्हर्स झपाझप इकडे तिकडे करीत होता. आपल्या थोट्या पायामुळे आपल्या गतीत बिलकुल वैगुण्य येता कामा नये अशी जबरदस्त इच्छाशक्ती त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. अशाप्रकारे विलक्षण चपळाईनं तो लंगडत असतांना त्याच्याकडे पहाणं नको असं तिला वाटलं. त्याच्या सहवासांत असण्याची तिची इच्छा आश्चर्याच्या धक्क्यानं फुटून तुटून तिचे बारीक बारीक तुकडे झाले. परंतु त्याच्या चर्येवर आणि आवाजात जो गोड स्नेहभाव होता त्याचीही जाणीव तिला सारखी होती. वाडीवरच्या शेती बागायतीतून खूप पैसा काढावा, स्नेहीसोबती करावेत, एखाद्या स्त्रीवर प्रेम करावं यासाठी त्याच्या जीवाची धडपड चालली होती ती त्याच्या बोलण्यांतल्या प्रत्येक शब्दांत तिला दिसत होती. आपल्या शरीरात जणू कांही व्यंग नाहीच अशा भावनेनं त्यानं अनेक स्वप्न रचली होती.
त्याच्या लाकडी पायाची हकीकत त्याच्या अगर त्याच्या आईच्या बोलण्यात येणार याबद्दल तिची खात्री होती. परंतु तो विषय निघाला नाही. ट्रॅव्हर्स व त्याची आई यांच्याबरोबर तिनं चहा घेतला. ज्या खोलीत ती तिघं चहा घेत बसली होती ती ट्रॅव्हर्सनं स्वत:च्या हातानं सजविली होती. निळसर गुलाबी रंगाचे कागद भिंतीवर चिकटविले होते. एके ठिकाणी बाजाची पेटी ठेवलेली होती. खोलीत आलेला सूर्यप्रकाश पिवळसर कांचेच्या तुकड्यांसारखा भासत होता.आपण जिवलग मित्रांच्या सहवासात आहो असं वाटावं असं त्या खोलीतलं एकंदर वातावरण होतं. बाहेरच्या बाजूकडल्या एका खिडकीत 'डॅफोडिल' ची कुंडी होती. तिच्यातल्या रोपट्यांवरची फुलं उन्हानं थोडीशी सुकून गळलेली होती. टेबलापाशी तिच्यासमोर बसलेल्या ट्रॅव्हर्सकडे लिलिअननं पाहिलं तेव्हा त्याचा लाकडी पाय ती अजिबात विसरुन गेली, व हॉटेलात तिचं लक्ष प्रथम त्याच्याकडे गेलं तेव्हा जसा त्याचा चेहरा ममताळू आणि विचारात गढल्यासारखा तिला दिसला होता तसाच तो आतांही तिला वाटला.
मात्र तिनं आपल्या मनाशी काही वेळापूर्वीचनिश्चय करुन टाकला होता की पुन्हा या ठिकाणी यायचं नाही. परत जाण्यासाठी ती जेव्हा गाडीत बसली तेव्हा ट्रॅव्हर्सनं तिला भेट म्हणून दिलेलं मधाचं भांडं आणि बागेत फुललेल्या 'डॅफोडिल' फुलांचा गुच्छ हातात धरुन बसल्या बसल्या आपण या स्थळाचा कायमचा निरोप घेत आहोत अशा विचारानं तिला बरं वाटलं. क्लेशकारक गोष्टीपासून सुटका झाल्याचं समाधान ती अनुभवीत होती.
परंतु आठ दिवसांनी ती परत आली. ट्रॅव्हर्सनं तिला चल म्हटलं, आणि नको म्हणून सांगण्याइतकं कठोर तिला होता आलं नाही. आता एप्रिलचा महिना सुरु झाला होता, व 'डॅफोल' ची पुरती उमललेली फुलं उन्हात डोलत होती. वाडीवरुन गेलेल्या रहदारीच्या रस्त्याच्या कडेला डॅफोडिलचे गुच्छ ठेवून विकण्याची नवी कल्पना ट्रॅव्हर्सनं काढलेली होती. त्यामुळे तीट्रॅव्हर्सबरोबर येऊन पाहाते तो त्याची आई रस्त्याच्या कडेला मांडलेल्या एका टेबलाशी बसली होती. त्या टेबलावर डॅफोडिल फुलांच्या छोट्या छोट्या कुंड्या ठेवलेल्या होत्या, आणि एक त्रिकोणी पत्रा जवळच टांगलेला असून 'डॅफोडिल फुलं तीन आण्याला एक गुच्छ' असं पत्र्याच्या दोन्ही बाजूंवर पांढऱ्या रंगानं लिहिलेलं होतं.
रस्त्यानं एखादी मोटार आली की टेबलाजवळ वाट पाहात बसलेली ट्रॅव्हर्सची आई एक कुंडी उचलून वर करुन दाखवी. म्हातारीच्या त्या कृतीकडे पाहातांचआपण या ठिकाणी पुन्हा न येण्याचा निश्चय केला असूनही का आलो ते लिलिअनच्याएकदम लक्षात आलं. या मंडळाची जगण्यासाठी जी धडपड चाललेली होती तिचा स्पर्श आपल्या अंत:करणाला होऊं न देणं लिलिअनला अशक्य होतं. म्हातारीनं तिला पाहातांच हास्य केलं आणि पुन:पुन्हा उच्चारलेल्या त्याच त्या शब्दांनी आपला आनंद व्यक्त केला तेव्हा ती आणि ट्रॅव्हर्स स्नेहाची किती भुकेली होती ते तिला कळलं. त्या दोघांच्या एकटेपणाची अनुकंपा तिला वाटली होती. म्हणून ती पुन्हा परत आली होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा