तिच्या हदयाची हाक - एच. ई. बेटस घरांत जाण्याऐवजी लिलियन म्हातारीला म्हणाली,' फुलं विकण्यात मी मदत करते तुम्हाला. मी बसते तुमच्याजवळ. 'हॅरी घरात गेला, आणि ती त्याच्या आईजवळ बसून राहिली. दुरुन एखादी गाडी येतांना दिसली की म्हातारी आणि ती' डॅफोडिल 'च्या कुंड्या उचलून दाखवीत. परंतु गाडी थांबत नसे. एखादी गाडी वेग कमी करुन सावकाश जाऊ लागे ;परंतु तिच्यातली माणसं क्षणभर' डॅफोडिल 'च्या फुलांकडे, त्या दोघीजणींकडे, आणि वाडीवरच्या पिवळ्या घराकडे बघितल्यासारखं करीत, आणि मग गाडी पुढे जाई. सारं वातावरण इतकं विलक्षण शांत होतं की शहरात राहाणाऱ्या लिलियनला ते मनाची चलबिचल करणारं वाटलं. जिकडून तिकडून फुलांचे आणि सूर्यकिरणांनी गुळचट झालेल्या गवतांचे गंध येत होते. वाडीमागच्याविस्तीर्ण शेतवाडी सूर्यतापानं झोपी गेल्यासारखी वाटत होती. म्हातारी लिलिअनशी मधून मधून बोलत होती. या ब...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा