अण्णा
वर्ष झाले. अण्णा गेले असे वाटतच नाही. आजही त्यांनी उभारलेल्या घराच्या अंगणात गोकुळ नांदतय. त्यांनी अंगणात लावलेल्या आंब्याला मोहर आला आहे. पेरुच्या झाडावर पाहुणे पक्षी हजेरी लावून जात आहेत. उगवत्या सूर्याचे ग्रिल असलेले गेट. नक्षीदार भिंतीतील कोनशिलेवर नाव नजरेत भरतात 'श्री पुंडलिकराव भिमसिंगजी धुमाळ आणि त्याखाली सौ. सुलभा पुंडलिकराव धुमाळ' त्याखाली योगेश्वर बंगला क्रमांक 23 गोदावरी हाऊसिंग सोसायटी नं1. पांढर्या शुभ्र गोकर्णीची वेल डोकवती. जवळच पांढरया चांदणीचे फुलझाड. मध्ये फरशीचा रस्ता. दोन्ही बाजूला अबोली, गुलाब, तुळशी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा